ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गटकार्यालय चंद्रपूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर वसाहत चंद्रपूर येथे भारत देशाच्या ७४ व्या प्रजाकसत्ताक दिनानिमित्य चंद्रपूर गुणवंत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष अख्तर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.Republic Day flag hoisting program completed at Kamgar Kalyan Kendra Urjanagar
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य खजाणिस तथा जिल्हाध्यक्ष देवराव कोंडेकर तर प्रमुख अतिथी कामगार नेते तथा राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मा नरेंद्र रहाटे ,जेष्ठ गुरुदेव सेवक भीमराव कुळमेथे,विठ्ठलराव देठे यांची उपस्थिती होती.अख्तर खान व नरेंद्र रहाटे यांनी प्रजाकसत्ताक दिनानिमित्य आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव कोंडेकर यांनी कोरोनाच्या महामारी नंतर प्रथमच सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा होत असून फार उत्साहाचे वातावरण असल्याचे मत व्यक्त करून मंडळाच्या विविध योजनांचा कामगार व कुटुंबियांनी लाभ घेण्याचे आवाहन केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात मंडळाच्या शिशुमंदिरचे बाल गोपालांना खाऊ व चॉकलेट्सचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहना खोब्रागडे मॅडम यांनी केले तर आभार सुवर्णा उपरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेकरीता केंद्राचे प्रभारी संचालिका मोहना खोब्रागडे मॅडम,कविता सदाफळे,सुवर्णा उपरे यांनी सहकार्य केले.यावेळी ऊर्जानगर वसाहतीतील जेष्ठ नागरिक ,शिशुमंदिरचे बालक व पालकांची व जेष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment