भद्रावती तालुका प्रतिनिधी : crime news प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाकरता मुख्यालय गेलेल्या धनपाल व कृषी पर्यवेक्षकाच्या घरी दोन पाच चोरट्यांनी साडे सतरा हजार रोकडसह साडेपाच लाखाचा ऐवज लंपास केला आहे. 26 जानेवारीच्या पहाटेला उघडकीस आली आहे. घराच्या समोर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये पाच आरोपींनी केलेली चोरी कॅमेराबदद झाली आहे. भद्रावती(Bhadravati) पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली असून 'आरोपी मात्र पसार झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भद्रावती शहरात घनश्याम नगरी वसलेली आहे. यामध्ये शंभर ते दीडशे कुटुंब वास्तव्यास आहे. काल 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त देऊळ कालणीतील राजेश महातव हे राजुरा (Rajura) येथे तर पत्नी ही चंद्रपूर ला गेलेली होती. त्यामुळेघराला कुलूप लावून घर बंद करण्यात आले होते. याच संधीचा फायदा काही भामट्यां चोरट्यांनी घेतला. रात्री साडेतीनच्या सुमारास
पाच चोरट्यांनी राजेश महातव यांचे घरातप्रवेश करून कपाट फोडला. त्यामध्ये ठेवलेले साडेचार लाखाचे सोन्याचे ऐवज लंपास केले.तर साडेसतरा हजाराची रोकडही लांबविली. असा एकूण रोख रक्कमेसह पाच लाखांचाऐवज राजेश श्याम महातव यांचे घरातून लंपास केला. तर याच घराजवळील कृषी विभागात पर्यवेक्षक असलेले उमाकांत बोधे यांचे घरी 58 हजाराचा
सोन्याचा ऐवज लांबविला. बोधे गडचिरोली जिल्ह्यात नोकरीवर आहेत. त्यामुळे ते काल प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाकरीता गेले होते तर घरचे मंडळीही बहिणीकडे बाहेर गावी गेले होते. त्यामुळे घर कुलूप बंदकरण्यात आले होते. घनश्याम नगरीत देऊळ कॉलोनीत एकाच रात्री घरफोड्या झाल्याने
नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालीआहे. आज सकाळी दोन्ही कुटुंबे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपून घरी पोहोचल्यानंतर
चोरीची घटना उघडकीस आली. लगेच भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखलकरण्याकरीता फिर्यादी गेल्यानंतर त्यांची तक्रार दाखल करण्यात आली नाही.
सामाजिक कार्यकर्ते सिकंदर यांनी
लोकप्रतिनिधींना माहिती दिल्यानंतर
पोलिसांनी तक्रार दाखल केली. मात्र रात्रीच घरफोड्या केल्यानंतर आरोपी पसार झालेत. याच परिसरात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये चोरीची घटना
कॅमेराबध्द झाले आहे. त्यामध्ये पाच आरोपीचोरी करताना दिसून येत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची स्थिती जाणून घेतली. फॉरेन्सिक टिमी व डॉगस्काट लाख पाचारण करण चोरट्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो असफल ठरला. आरोपींनी
महातव यांचे घरातून चोरी दरम्यान चे फिंगर प्रिंट मिटविले तर बोधे यांचे घरात आढळुन आले आहे. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी चोरी
झाली त्याठिकाणी हॅलोजन लावण्यात आले आहे तरीही आरोपींनी उजेडात चोरी केली आहे.
काल 26 जानेवारी च्या रात्री साडेतीनच्या सुमारास घनश्याम नगरीतील देऊळ कॉलनीमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करून साडेपाच लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. भद्रावती शहरात ही चोरीची घटना पहिलीच नव्हे. अनेकदा घरफोड्या झालेल्या आहेत आणि घरफोडीचे सत्र नियमित सुरू
आहे. याकडे भद्रावती पोलिसांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ठाणेदार गोपाल भारती यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात पदभार सांभाळल्यानंतर भद्रावती शहरातील चोऱ्या कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र चोरीच्या घटना कमी ऐवजी चोरीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे. चोरीच्या घटनेदरम्यान एखादी अनुचित घटना घडल्यास
त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारल्या जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेऊन भद्रावती शहरातील चोरीचे सत्र थांबवावे अशी मागणी होत आहे.
0 comments:
Post a Comment