सिरोंचा:- फेब्रुवारी महिण्यात दि.३,४,५ रोजी वर्धा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकठ्ठ्यासाठी शहरातील सुप्रसिद्ध कवी महेश कोलावार यांच्या 'मी कवी असल्याचा कधी-कधी मलाही होतोय ञास' शिर्षकांतर्गत कवितेची निवड झाली आहे.या संमेलनाच्या कवीकठ्ठ्यासाठी निवड झालेल्या कवींपैकी शहरातील हे पहिलेच कवी आहेत.
महेश कोलावार यांनी आजपर्यंत ग्रामस्तरीय कविसंमेलनापासून तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकठ्ठ्यापर्यंत जवळपास ५० च्या वर कविसंमेलनात व तसेच इतर काही कार्यक्रमात त्यांनी कविता सादर करुन अनेकांची प्रशंसा मिळविली आहे.गेल्या एक दशकाच्यावरुन एक कवी म्हणून तसेच साहित्यिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांना विविध क्षेञातून ५ पुरस्कार व विविध ठिकाणी अनेक सत्कार,सन्मान प्राप्त झाले आहे.
चंद्रपूर येथील नामांकित सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपुरचे ते सदस्य आहेत. तसेच वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेले संत गजानन महाराज साहित्य संघाचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे गेल्या एक दशकापासून ते जिल्हाध्यक्ष पदावर असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चंद्रपुरचे तालुका उपाध्यक्ष आहेत.तसेच भारतीय जनता पक्षाचे युवानेते आहे.साहित्य,सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,चित्रपट अशा विविध क्षेञात महेश कोलावार कार्यरत आहेत.
एक दशकापूर्वी सिरोंचा शहरात संत गजानन महाराज साहित्य संघाद्वारे त्यांनी कवी संमेलनाचे आयोजन करुन त्या परिसरात साहित्यिक जाळे पसरवण्याचा प्रयत्न व शुभारंभ केला.त्यानंतर त्यांचे अनेक प्रयत्न चालुच राहिले.पण आर्थिक परिस्थिती व इतर व्यक्तींच्या सहकार्याच्या अभावी तसे कार्यक्रम त्यांना पुढे घेता आले नाही.परंतु पुढे हा साहित्यिक वारसा आणि साहित्यिक जाळे या भागात कायमस्वरुपी पसरवण्याचे प्रयत्न सतत चालु राहतील अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहे.मागील एक दशकाच्यावरुन सिरोंचा शहरातून एक कवी म्हणून नेतृत्व करत असलेले महेश कोलावार या पिढीचे शहरातील पहिले कवी आहेत.
वर्धा येथे होणा-या साहित्य संमेलनाच्या कविकठ्ठ्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून आलेल्या १५०० च्या वर कवितांमधून महेश कोलावार यांच्याही कवितेची निवड झाली आहे.११ वर्षापूर्वी चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकठ्ठ्यात कोलावारांनी पहिल्यांदा कविता सादर केली असून यंदा दुस-यांदा अश्या प्रकारच्या निमंञित कविकठ्ठ्यामध्ये कविता सादर करणार आहेत.तेव्हा सदर कविकठ्ठा मंच सर्वांसाठी खुले होते.त्यानंतर ती पद्धत बदलून काही वर्षापासून आधी कविंची कविता मागवून त्यात केवळ निवड झालेल्या कवींनाच कविता वाचनाचे 'निमंञण' दिले जात आहे.
कोलावारांच्या या निवडीबद्दल सर्वञ त्यांचे कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment