चंद्रपुर /दुर्गापूर:-सिनाळा, नवेगाव, मसाळा या गावाच्या वेकोलिने भुसपांदन करून या गावाच पुनर्वसन कोयना गेट समोर केले असून वेकोलिने महावितरण ला ३ वर्षे आधी नविन विद्युत जोडणी करिता फंड सुद्धा देण्यात आले आहे. तरीही सुद्धा दुर्गापूर एरियाचे कनिष्ठ अभियंता कन्नाके यांच्याकडे विचारणा केली असता महावितरण कडे मीटर नसल्याचे कारण सांगून उडवा उडवीचे उत्तर देतात व ग्राहक क्रमांक जनरेट होत नाही आहे असे बे जबाबदार उत्तर देत ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरण च्या अभियंता कडून केले जात आहे .Sinala, Masala, Navegaon Rehabilitation Village in darkness due to poor management of Mahavitaran
चार-पाच महिन्या आधी मीटर मंजूर होऊन सुद्धा अद्याप वीज जोडणी झालेली नाही व वीज जोडणी मिळत नसल्याने ग्रामस्थ ला महावितरण कार्यालयावर चकरा माराव्या लागत आहे. तसेच बरेच ग्रामस्थांचे घर तयार असून सुद्धा भाड्याने राहावं लागत आहे.
तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असून सुद्धा विद्यार्थ्यांची रात्रो ला अभ्यास करण्याची गैरसोय होत आहे. व येत्या पुढील महिन्यात उन्हाळा सुरू होत आहे या अशा प्रचंड उष्णते मध्ये कसे राहायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे जर का लवकरात लवकर जर नवीन जोडणी जर दिले नाही तर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
0 comments:
Post a Comment