Ads

रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बल्लारपुर: बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुण रेल्वे मार्गाने जात असताना मागून रेल्वेची जबरदस्त धडक बसली. या धडकीत त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. रेल्वेच्या धडकेत त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २.१५ वाजता दरम्यान बल्लारपूर - चंद्रपूर रेल्वे अप रुळावर घडली.
A young man died in a train collision
अपघातात ठार झालेल्या तरुणाचे मोहन उर्फ गोलू देवराव खेलूरकर ( वय -३२ ) राहणार विसापूर तालुका - बल्लारपूर जि. चंद्रपूर असे नाव आहे.
मोहन उर्फ गोलू हा देवरावचा तिसरा मुलगा असून अविवाहित होता. त्याच्या हाताला काम नव्हते. मिळेल ते काम तो करत होता. मात्र मजुरी नियमित मिळत नाही. यामुळे तो त्रस्त होता. आज मोहन उर्फ गोलू बल्लारपूर - चंद्रपूर अप रेल्वे मार्गाने पुलाकडे जात असताना मागून धडधड करत रेल्वे आली. दरम्यान वीज खांब क्रमांक -८८५ बी /९ व ८८५ बी /११ दरम्यान रेल्वेच्या जबरदस्त धडकीत त्याच्या देहाचे दोन तुकडे झाले. यात मोहन जागीच गतप्राण झाला. याची माहिती रेल्वेच्या सीआरपी पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलीस मंगेश पायघन, शिवकुमार मीना व विसापूर पोलीस चौकीचे जमादार घनश्याम साखरकर व शिवराज वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे पाठविण्यात आले. घटनेचा अधिक तपास रेल्वे व विसापूर पोलीस करत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment