भद्रावती तालुका प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील मानोरा सिंगरु येथील एका अठ्ठावन वर्षीय इसमाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 1 रोज बुधवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यातील मानोरा सिंगरु येथे उघडकीस आली.दादाजी काकसु वाघे वय 58वर्ष असे या मृतक इसमाचा नाव आहे.man's suicide due to illness.
सदर मृतक हा काही दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होता.त्याने बरेच उपचार केल्यानंतरही त्याच्या तब्बेतीत सुधारणा झाली नाही.त्यामुळे हे आजारपण असह्य होऊन त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.मात्र त्याने ही आत्महत्या शेतीवर असलेल्या कर्जामुळे व नापिकीमुळे केली असल्याची चर्चा गावपरिसरात आहे.त्याच्या पश्चात दोन मुले आहेत.घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कार्यवाही करुन मार्ग दाखल केला आहे.घटनेचा अधीक तपास शेगाव पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment