Ads

खासदार बाळू धानोरकर यांचे भाकीत खरे ठरले

चंद्रपूर : नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघ व अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघ यामध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. असे भाकीत खासदार बाळू धानोरकर यांनी वर्तविले होते, तसेच त्यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दोन दिवसापूर्वी याबाबतच्या विश्वास व्यक्त केला होता. अखेर धानोरकरांचे हे भाकीत खरे असून सध्या त्यांच्या भाकितामुळे नव्या राजकीय चर्चेला पेव फुटला आहे.
MP Balu Dhanorkar's prediction came true
विशेष म्हणजे नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाची व अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघातील निवडणूक हि चुरशीची मानली जात होती. भाजपने दोन वेळा निवडून आलेले नागो गाणार व रणजित पाटील यांना आपला अधिकृत पाठिंबा दिला होता. मात्र महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड देत. चंद्रपूरचे भूमिपुत्र सुधाकर अडबाले आणि अमरावती विभागातील पदवीधर मतदारसंघातील धीरज लिंगाडे यांच्या विजय झाला. यापूर्वी या मतदारसंघावर भाजपचा बोलबाला होता. विदर्भात एकही जागा भाजप मिळवू शकली नाही.

दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात सभा देखील घेण्यात आल्या होत्या. त्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास ठेऊन मत देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यांच्या आवाहनाला साथ देत मतदारांनी मत रुपी आशीर्वाद देत या दोन्ही उमेदवाराला निवडून दिले. दोन्ही मतदार संघातील मतदारांचे खासदार बाळू धानोरकर यांनी आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment