Ads

देशी दारूच्या दुकानासाठी घेतलेल्या ठरावा विरोधात गावकरी पंचायत समितीवर

वरोरा :- वरोरा तालुक्यातील नागरी येथे २९ डिसेंबर २०२२ ला ग्रामपंचायत द्वारे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या ग्रामभेची बऱ्याच ग्रामस्थांना माहिती देण्यात आली नव्हती तर काहींना घरकुल व गावातील रस्त्याकरिता ग्रामसभा असल्याचे सांगून ग्रामसभा घेण्यात आली मात्र मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देऊन ही ग्रामसभा अवघ्या १५ मिनिटात आटोपून मोकळी करण्यात आली.ग्रामसभा आटोपल्यानंतर गावकऱ्यांना याबद्दल माहिती मिळताच आज नागरीतील महिलांनी पंचायत समिती वरोरा येथे गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार यांना निवेदन देऊन घेण्यात आलेली ग्रामसभा ही नियमबाह्य असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून पुन्हा आपल्या स्तरावर ग्रामसभा घेऊन गुप्त मतदान पध्दतीने फक्त महिलांना प्राधान्य देण्यात यावे.Villagers on Panchayat Samiti against resolution taken for country liquor shop
वरोरा तालुक्यातील नागरी येथे देशी दारुचे दुकानसुरु करण्याबाबत नाहरकत देण्यासाठी शासन नियम बाजुला ठेऊन नियमबाह्य ग्रामसभा घेतल्या गेली त्यातदेशी दारूच्या परवानगी साठी ग्रामसभा ही विशेष ग्रामसभा घेणे अनिवार्य होते परंतु ग्रामसभा नोटीसवर सर्वसाधारण सभा असल्याचा नोटीस सदर ग्रामसभेच्या नोटीसवर देशी दारू चा विषय पाहिजे होता पण त्यात इतरही विषय समाविष्ट होते त्यामुळे ही विशेष ग्रामसभा न होता सर्वसाधारण सभा असल्याचे निदर्शनास येते.सदर ग्रामसभेच्या नोटीसवर तांडावस्ती घोषीत करणे व तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामे प्रस्तावित करणे असा विषय होता पण याबाबत महिन्याआधी याबद्दल प्रस्ताव पंचायत समिती मध्ये आला यामुळेच ग्रामसभेत महिलांची दिशाभूल करून आपला उद्देश साध्य करणे हेच दिसून येत होते.

ग्रामपंचायत नागरी येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी पेंदे यांचा आदेश पंचायत समिती कार्यालयाकडुन महिण्यापासुन झालेला असतानासुद्धा प्रभारी सचिव यांच्याद्वारे ग्रामसभा घेण्यात आली त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदर ग्रामसभा ही संवेदनशील असल्यामुळे पंचायत समितीच्या स्तरावरून निरिक्षक म्हणून पंचायत विस्तार अधिका-याची नेमणुक करणे अनिवार्य होते पण तसे झाले नाही.

सदर ग्रामसभा घेताना वरिष्ठ पंचायत विभाग यांच्या मजुरीचे कोणतेही आदेश घेणे बाध्य आहे. सदर ग्रामसभेची प्रसिध्दी नियमानुसार ग्रामसभेच्या तीन दिवसाचे आत करणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही.

तसेच ग्रामसभेत गावात हजर नसलेल्या लोकांच्या बनावट सह्या व नावाची नोंद करण्यात आली. नागरी गटग्रामपंचायत यापूर्वी ३० वर्षाअगोदर देशी दारूचे दुकान अस्तित्वात होते पण महिलांनी ते दुकान बंद केले. यामुळे शासनाची नियम अनुसुचीनुसार सदर दुकानाला पुन्हा नाहरकत
देण्यासाठी केवळ १०० टक्के महिलांची ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे पण तसे झाले नाही.

सदर ग्रामसभेकरिता हजर राहण्यासाठी घरकुल, सिमेंट रोड, शौचालय असे खोटे आमीष सांगुन महिलांना हजर राहण्यासाठी बोलविले पण जेव्हा महिलांना देशी दारूचे दुकानासाठी ना हरकत घेण्यासाठी असे माहिती झाले तेव्हा महिला ग्रामसभेतून परत आल्या यावरुन त्यांनी केलेल्या सहा ह्या दारु दुकानाचे ना हरकत यासाठी नसल्याचे स्पष्ट होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरी येथील विद्यार्थी कोंबून शाळेच्या वेळेत ग्रामसभा घेण्यात आली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की आमच्या खोट्या सह्यानिशी ग्रामपंचायत ठराव देशी दारूचे दुकानाकरिता त्याचा वापर करून परवाना काढण्याकरिता जोडत असेल तर ते संपुर्णपणे बेकायदेशीर आहे. यासंबंधाने झालेल्या ग्रामसभेच्या ठरावावर पुर्णपणे महिलांच्या वतीने स्थगिती देण्यात यावी अन्यथा नागरी येथील महिलांच्या वतीने मोठे आंदोलन सुध्दा करण्यात येईल तसेच गावाची शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील.
तसेच सर्व मुद्याला अनुसरुन दिनांक २९/१२/२०२२ची ग्रामसभा नियमबाह्य असल्याने बेकायदेशीर ग्रामसभा घेणा-या संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यासंबंधात आपल्या स्तरावर कायदेशीर ग्रामसभा घ्यावी तसेच देशी दारुचे दुकानाकरिता ना हरकत बाबत गुप्त मतदान पध्दती केवळ महिलांना प्राधान्याने घ्यावे अशी विनंती उपस्थित महिलांकडुन करण्यात यावी.निवेदन देते वेळेस गंगा विनोद वाटमोडे, माजी उपसरपंच चंद्रशेखर नौकरकार,माजी सभापती रोहिणी देवतळे,विनोद वाटमोडे,सोनू वाघमारे,हितेंद्र स्वर्गवानी,अशोक धात्रक,अमोल गोल्हर,मारोती नागपुरे,पूजा मोहर्ले, मंदा शिंदे,रेखा चौधरी, करिष्मा भलमे, वैशाली नौकरकार,सुनंदा पारशे,डिंपल शेख,इम्रान पठाण,वशीम शेख,गजानन ढगे, पुष्पा पाझारे,कविता रेवतकर,शोभा सरूरकर,अनिता ढगे, रेखा गुरनुले, शारदा निकुरे,नंदा निकुरे,लक्ष्मी गुरनुले, वनिता कुमरे,सुनंदा आडे,आलेखा पठाण कल्पना वाटगुरे उपस्थित होत्या.
नागरी येथील महिलांनी निवेदन दिले आहे.विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करू व चौकशी अंती जो निष्कर्ष निघेल त्या अनुसरून कारवाई करू.
      संदीप गोडशलवार
   संवर्ग विकास अधिकारी
   पंचायत समिती वरोरा
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment