सिंदेवाही : माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी 8 वाजता ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी 9 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.Kranti Jyoti Savitribai Phule Jayanti Festival organized at Mohbodi
त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. नगराळे सर माजी प्राचार्य ग्रा. वि. विद्या. पेटगाव, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. प्रतिभाताई मोहूर्ले एडवोकेट सिंदेवाही, किरण बोरुले, सदस्य मा. म. जि. स. चंद्रपूर, श्री गुरुदास शेंडे सर, चंद्रपूर, खेमराज डोंगरवार सर ब्रह्मपुरी, सौ. आरती खंगार मॅडम, मोहबोडी, कु. किनेकर, वनरक्षक मोहबोडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव गौरव पुरस्काराने सन्मानित व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर 2 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन आयोजन व चर्चासत्र आणि नंतर त्यासोबतच महिलांचे व मुला-मुलींच्या विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता गावसह भोजनानंतर रात्री 8 वाजता महिलांचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment