चंद्रपुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या 59 व्या वाढदिवसा निमित्त माता महाकाली मंदिरासह शहरातील विविध धर्मीय 59 धार्मीक स्थळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पुजा, महाआरती, आणि प्रार्थना करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या सह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Puja, aarti and prayer at 59 different religious places including Mata Mahakali Temple on behalf of Young Chanda Brigade on the occasion of Chief Minister's birthday
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस संपुर्ण महराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. चंद्रपूरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या निमित्त क्रिष्णा नगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 59 व्या वाढदिवसानिमीत्त माता महाकाली मंदिर, अंचेलश्वर मंदिर, महादेव मंदिर, कन्यका मंदिर, एकोरी मंदिर, साई बाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर, गायत्री मंदिर यासह इतर मदिंरामध्ये पुजा व महा आरती करण्यात आली. तर बाबातुल्ला शाह दर्गा, ईनार शहा दर्गा, येथे जियारत करण्यात आली. अशोका बुध्द विहार, गंध कुटी बुद्ध विहार, तथागत बुद्ध विहार, अशोका बुद्ध विहार, सुपटीपन्नो बुध्द विहार, धम्म कुटी बुद्ध विहार, सधम्म बुध्द विहार, कर्मभुमी बुध्द विहार या ठिकाणी बुध्द वंदना करण्यात आली, लव्ह इंडिया चर्च आणि संत थॉमस चर्च येथे प्रेअर करण्यात आली.
गुरुद्वारा, मुल रोड वरिल जय सेवा गोंडवाना गोटुल येथे महागोंगो करत मुख्यमंत्री यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या आयोजनासाठी यंग चांदा ब्रिगेडचा महिला अल्पसंख्याक आघाडी, आदिवासी आघाडी, बंगाली आघाडी, बहुजन आघाडी, उत्तर भारतीय समाज आघाडी, हलबा समाज आघाडी, आदींनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment