Ads

चित्र प्रदर्शनातून मोदी सरकारची पोलखोल

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. देशातील वाढत्या महागाईने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. हाताला काम नसल्याने युवा वर्ग नैराश्यात आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. छोटे-मोठे व्यापारी अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवण्याच्या उद्देशातून जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. २१) चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोदी सरकारची पोलखोल करण्यात आली आहे.

Modi government's Exposed through picture exhibition
काँग्रेसचे खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा काढण्यात आली. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दुसरा टप्पा म्हणून हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील मोदी सरकारची जनविरोधी धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील कस्तुरबा चौकात चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता करण्यात आले.

एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या वित्तीय संस्थांमध्ये देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समूहातील गैरकारभारामुळे गुंतवणूक केलेले कोट्यवधी रुपये परत मिळतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किवा सरकारमधील कोणताही मंत्री यावर बोलायला तयार नाही. देशातील गरिबी कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे देशातील जनतेला फुकट धान्य देण्याचा अर्थ काय होतो, असा सवाल खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी यावेळी उपस्थित केला.

केंद्रातील मोदी सरकारने अनेक जनविरोधी धोरणे राबविली आहेत. त्यामुळे देशातील सर्वच घटक आजघडीला अनेक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे अखिल भारतील काँग्रेस कमिटीने सुरू केलेल्या हाथ से हाथ जोडे अभियानांतर्गत चित्र प्रदर्शनातून मोदी सरकारची चुकीची धोरणे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले.

खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार सुभाषभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजितभाऊ वंजारी, आमदार सुधाकरभाऊ अडबाले यांच्या मार्गदर्शनात प्रदर्शन आयोजित केले होते. उद्घाटनानंतर शहरातील नागरिकांनी प्रदर्शन बघण्यासाठी मोदी गर्दी केली होती. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, गोपाळ अमृतकर, प्रवीण पडवेकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, भालचंद्र दानव, सुनीता अग्रवाल, सुनीता लोढिया, अजमद अली, चंदा वैरागडे, सुनंदा धोबे, मोहन डोंगरे, वंदना भागवत, निशा धोंगडे, हर्षा चांदेकर, पप्पू सिद्दीकी, विना खनके, सकिना अन्सारी, रमिझ शेख, राहुल चौधरी, राजवीर यादव, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम, राजेश रेवल्लीवार, नीलेश खोबरागडे, यश दत्तात्रय, विजय पोहनकर, राजेश वर्मा, ताजुदीन शेख, रामटेक, प्रकाश देशभ्रतर मोन रामटेके, केतन दुरसेलवार, विनित डोंगरे, मनोज खांडेकर, काशिफ अली, मतीन कुरेशी, सागर खोब्रागडे, इरफान शेख, सौरभ ठोंबरे, साबीर सिद्दिकी, ऐजाज शेख, अशोक गद्दमवार, दौलत चलखुरे, राजेश रंगरी, निरीक्षण गवंडे, मिनाक्षी गुजरकर, मुन्नी मुमताज शेख, वैभव रघाताटे, धरमु तिवारी, दिनेश शेडमाके यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment