Ads

मिस्टर चंद्रपुर श्री 2023 चा मानकरी ठरला कमलेश कश्यप

चंद्रपुर :- चंद्रपूर बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असो.च्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा चंद्रपुर श्री - २०२३ चे दि 18/02/2023 शनिवारी सांय 6:00 वाजता गांधी चौक मनपा पटांगणावर चंद्रपुर येथे भारतीय शरीरसौष्ठव महासंघ व बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस विदर्भ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली.Kamlesh Kashyap became the winner of Mr. Chandrapur Shri 2023
या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार ,आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते तर सहउद्घाटक श्री. ब्रिजभुषणजी पाझारे माजी सभापती, स.क., जि. प. चंद्रपूर भा.ज.पा. महामंत्री चंद्रपूर महानगर म्हणून होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे जिल्हा शहर अध्यक्ष भाजपा चंद्रपुर महानगर, श्री. राहुलभाऊ पावडे, माजी उपमहापौर, मनपा, चंद्रपूर
मा. श्री. विशालजी निंबाळकर, CBBFA अध्यक्ष, भा.ज.यु.मो. चंद्रपूर, माजी नगरसेवक, संजय कंचर्लावार माजी नगरसेवक मनपा,
श्री. कुणालभाऊ चहारे, सचिव, महा. प्रदेश यु. कॉ., श्री. रणजीतभाऊ डवरे, माजी उपसभापती,कृ.उ.बा.स., चंद्रपूर श्री. अॅड. राहुलजी घोटेकर, माजी नगरसेवक, मनपा, चंद्रपूर. श्री. राजेशजी सोलापन, जिल्हाध्यक्ष, म. रा.ग्रामीण पत्रकार संघ हे उपस्थित होते.
सदर स्पर्धे करिता विदर्भाचे नामवंत पंच महासचिव व पदाधिकारी आले होते या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते उत्कृष्ट बॉडीबिल्डर मिस्टर एशिया हे होते. स्पर्धेचे निर्णायक म्हणून राष्ट्रीय पंच श्री अभिषेक कारींगवार ,श्री विशाल शिंदे,श्री किशोर अदमाणे, महाराष्ट्र श्री अविनाश वाघुले आणि मिस्टर युनिव्हर्स, श्री किशन तिवारी हे उपस्थित होते.

या शरीरसौष्ठव स्पर्धेचे मुख्य विजेते मिस्टर चंद्रपुर श्री ,कमलेश कश्यप ,(बेस्ट पोजर) राज अटकापूरवार ,(बेस्ट मस्कुलर) आशिष बिरीया , (बेस्ट इम्प्रेव्हमेंट) विक्की पेंदाम, बेस्ट फिजिक्स राज अटकापूरवार ,बेस्ट मास्टर सुनील नन्हेट हे ठरले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चंद्रपुर बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष विशाल निबाळकर ,उपाध्यक्ष राजेश सोलापन ,कार्याध्यक्ष खेमराज हिवसे ,सचिव सुभाष लांजेकर,सहसचिव प्रशील पोगुलवार ,कोषाध्यक्ष विवेक बुरडकर, सल्लागार रणजित डवरे, पदाधिकारी गणेश रामगुंडेवार,मुकेश पांडे, कल्पेश रणदिवे ,सावन कालीवाले, अक्षय अंबीरवार,करण कालीवाले ,करण पडवेकर,प्रमोद जिवतोडे आदींनी अथक परिश्रम घेतले. स्पर्धेचे समालोचन मोंटू सिंग यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment