चंद्रपूर : दि एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये वेगवेगळी पारितोषिके जिंकून शाळेचे नाव उंचावले आहे.Success of Indira Gandhi Garden School students in municipal competition
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता 8वीची विद्यार्थिनी निर्मिती लुलू हिने चित्रकला/पोस्टर मेकिंग स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले. याच वर्गातील मिकाईल अली या विद्यार्थ्यानेही 'बेस्ट आऊट ऑफ वेस्ट' स्पर्धेत तिसरे पारितोषिक पटकावले.
महापालिकेच्या पार्किंग मैदानात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महानगर पालिकेच्या वतीने पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जोरगेवार यांच्या हस्ते निर्मितीने 3000 रुपयांचा रोख पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मिकाईलला 2000 रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, डॉ.गोपाल मुंधरा, डॉ.मंगेश गुलवडे आदी पाहुणे उपस्थित होते.
दोन्ही विद्यार्थ्यांना चित्रकला व हस्तकला शिक्षक चंद्रशेखर घुटके यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. विजेत्यांना शाळेतील मुख्याध्यापक बावानी जयकुमार यांच्या हस्ते त्यांच्या यशाबद्दल गौरविण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment