Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रैक्टर वर महसुल विभागाची कारवाई.

भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख) :रात्रीचा फायदा घेत रेतिची तस्करी करीत असलेले एक ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले.सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात गौण खणीज पथकाने दिनांक 13रोज सोमवारला मध्यरात्रीनंतर तालुक्यातील पिपरी येथील नदिघाटावरील केली.सदर रेतितस्करितील ट्रैक्टर महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.या घटनेत जवळपास एक लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे.Revenue department action against tractors smuggling illegal sand.
सदर पिपरी नदिघाटावरुन नेहमी रात्रोच्या वेळला रेतिची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार अनिकेत सोनवणे व त्यांच्या पथकाने प्रथम घटनेच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीनंतर या घाटाची पाहणी केली मात्र याचा सुगावा आधीच लागल्याने रेतितस्कर घाटावर आढळून आले नाही.त्यानंतर घटनेच्या दिवशी वेगळे नियोजन करुन पथकाने घाटाची अचानक पाहणी केली असता सदर ट्रैक्टर रेतिची तस्करी करतांना आढळून आले.त्यावर कारवाई करण्यात आली.सदर ट्रैक्टर मालकाचे नाव संदीप नांदे असुन तो पिपरी येथील रहिवासी असल्याचे कळते.या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात सुरु आहे. सदर रेतिघाटाचा अद्याप लिलाव झाला नसल्याने या घाटासोबतच तालुक्यातील अन्यत्र अवैध रेतिव्यवसायाला जोर पकडला आहे.या रेतितस्करांवर आळा घालण्यासाठी रेतितस्करांविरोधात मोहिम सुरु असल्याचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांनी सांगीतले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment