Ads

पट्टेदार वाघाच्या हल्यात गाय ठार : वासरू जखमी

भद्रावती :जावेद शेख तालुका प्रतिनिधी -तालुक्यातील घोडपेठ जवळील मौजा: चालबर्डी येथील शेत सर्व्हे नंबर १७८/१ मधील जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांनापैकी दि.२४ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने A striped tiger एका पाळीव गायीला हमला करून ठार केले तर यावेळी एक वासरू गंभीर झाल्याची घटना घडली.यात पीडितांच्या जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर गाय ही गरोदर असल्याचे वनविभागाकडे तक्रारीत नमूद केले आहे.Cow killed by striped tiger : Calf injured
शालिनी खुशाल धानोरकर असे गाय मालकाचे नाव असून मौजा: चालबर्डी शेत शिवारातील नेहमीप्रमाणे शेतातील गोठ्यात इतर पाळीव प्राण्यांप्रमाणे गोठ्यात गायीला बांधून ठेवण्यात आले होते.अचानक शुक्रवारच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाने गोठ्यात प्रवेश करून एका ५ वर्षीय पाळीव गाईवर हमला केला त्यात तिचा मृत्यू झाला.त्यातच एका वासरावर हमला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.या घटनेची तक्रार भद्रावतीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात केली असून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केलेल्या तक्रारीतून केली आहे.या घटनेचा वन विभागाने पंचनामा केला असून वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment