भद्रावती तालुका प्रतिनिधी:- तालुक्यातील सायवन या गावाजवळ एका अज्ञात यूवकाचे प्रेत रेल्वे लाईन लगतच्या नालीमध्ये कुजल्या अवस्थेत आधळून आले.पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीता भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले .दोन दिवसानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता उत्तरीय तपासणी दरम्यान त्याच्या अंगावरील कपडे काढल्यानंतर त्याच्या पँटच्या खिशात मिळालेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून अखेर त्याची ओळख पटली.Finally, the unknown youth was identified
भद्रावती शहरातील झिंगूजी वार्ड निवासी संदीप विठ्ठल पचारे (३२) असे त्या मृत युवकाचे नाव असून तो १५ ते १६ दिवसापासून स्वतःची मोटर सायकल घेऊन घरी कोणालाही न सांगता घरून निघून गेला.त्याची शोधाशोध करून देखील त्याचा शोध लागला नाही.सोबत नेलेला मोबाईल देखील बंद दाखविण्यात येत होता.शेवटी त्याचे वडिलांनी भद्रावती पोलिसात घरून निघून गेल्या बाबतची तक्रार दाखल केली.अज्ञात युवकाच्या मिळालेल्या प्रेताची ओळख पटऊन घेण्याकरिता निघून गेलेल्या युवकाच्या अंगावरील कपड्यांच्या वर्णनानुसार पोलिसांनी त्याच्या वडीलास बोलविले.मात्र प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी ओळख देण्यास नकार दिला .शेवटी तीन दिवसानंतर अज्ञात प्रेताची विल्हेवाट करण्यास सुरुवात केली असता त्याचे प्यांटच्या खिशात त्याचे नाव असलेली डॉ.आवारी यांचे दवाखान्यातील चिठ्ठी मिळाली.या चिठ्ठीचे आधारावरून मंगळवार दि.७ फेब्रुवारीला अखेर त्या अज्ञात युवकाच्या प्रेताची ओळख पटली. सदर प्रेत कुजलेल्या व त्याचे दोन्ही पाय तुटल्या अवस्थेत असल्याने तसेच त्याची मोटर सायकल व मोबाईल घटनास्थळी आढळून न आल्याने त्याची आत्महत्या नसून घातपात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल भारती यांचे मार्गदर्शनात सहा.पो.नि.अमोल कोल्हे व पो.हे.का.देरकर हे करीत आहे.
0 comments:
Post a Comment