भद्रावती(जावेद शेख) :-
भद्रावती पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोपाल भारती यांची बदली झाल्यानंतर त्याच्या जागेवर नवे ठाणेदार बिपीन इंगळे हे भद्रावती ठाण्यात रुजु झाले आहेत.त्यांनी येथील कार्यभार स्विकारल्यानंतर व्हाईस आफ मिडियाच्या भद्रावती तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
Bipin Ingle join as Bhadravati police Station In charge.
या बैठकीत शहरातील विवीध समस्यांवर चर्चा झाली. यावेळी पत्रकारांनी त्यांना येथील विवीध समस्यांबाबत अवगत केले.या सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यात येईल असे ठाणेदार बिपीन इंगळे यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना सांगितले.नवे ठाणेदा बिपीन इंगळे हे यापुर्वी चंद्रपुर येथील आर्थीक गुन्हे अन्वेषन विभागात कार्यरत होते त्यामुळे त्यांना पुरेसा अनुभव असल्याने त्यांच्याकडून शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्यांच्या अनुभवाचा शहरात फायदा होऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था ऊत्तम होऊन गुन्हेगारी जगतात वचक बसेल अशी आशा शहरात व्यक्त केल्या जात आहे.सदर पार पडलेल्या बैठकीत शहरातील कोलमडलेली वाहतुक व्यवस्था,गुन्हेगारी,चोऱ्यांचे वाढते प्रमाण,बेलगाम वाहतुक आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी व्हाईस आफ मिडियाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष डा.यशवंत घुमे,भद्रावती तालुकाध्यक्ष सुनील बिपटे,सरचिटणीस जावेद शेख,तालुका कार्याध्यक्ष वतन लोणे,कोषाध्यक्ष अब्बास अजाणी,सुनील पतरंगे,ईश्वर शर्मा,शंकर डे आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment