Ads

श्री दत्त साडी सेंटरला लागलेल्या भीषण आगीत ६० लाखाची हानी 60 lakhs loss in severe fire at Shree Dutt Sari Centre

मूल :- पोलीस स्टेशन आणि पोस्ट आँफीस लगतच्या गोगीरवार यांच्या मालकीच्या श्री दत्त साडी सेंटरला रात्रो अंदाजे ११ वा. चे सुमारास आग लागल्याने जवळपास ६० ते ६५ लाखाची हानी झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. नेहमी प्रमाणे रात्रो ८.३० वा. सुमारास दुकान मालक बंडु गोगीरवार दुकान बंद करून घरी पोहोचले, दुकाना समोर वास्तव्याने असलेले माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांना मध्यरात्री १ वाजताचे सुमारास श्री दत्त साडी सेंटरला आग लागल्याची माहिती होताच त्यांनी तातडीने नगर परिषद व पोलीस प्रशासनास माहिती देवुन अग्नीशमन पथकास पाचारण केले.
60 lakhs loss in severe fire at Shree Dutt Sari Centre
 दुकान मालक बंडु गोगीरवार यांनाही बोलावुन घेत दुकानाचे शटर उघडले तेव्हा आगीत दुकानाच्या तळमजल्यामध्यें असलेले बहुतांश महागडी कापड आगीच्या भक्षस्थानी सापडल्याचे दिसले. घटनास्थळी पोहोचलेल्या मूल आणि सावली नगर परिषदेच्या अग्नीशमन पथकासह स्थानिक पोलीस कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. दुकानात लावलेल्या इनव्हर्टरमूळे अंदाजे ११ वा. नंतर आग लागल्याची शंका दुकान मालक बंडु गोगीरवार यांनी व्यक्त केली असून लागलेल्या आगीत त्यांचे जवळपास ५५ ते ६० लाखाची हानी झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. आग लागल्याची माहिती होताच तातडीने स्थानिक अग्नीशमन पथक पोहोचल्याने दुकानाच्या वरच्या माळयावरील कापड साहित्य सुरक्षीत राहीले. अन्यथा मोठी वित्त हानी झाली असती. आग लागल्याची माहिती होताच घटनास्थळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, ठाणेदार सतिशसिंह राजपुत, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार यांचेसह कर्मचारीवृंद उपस्थित झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment