Ads

कोठा (मुरमाडी) येथिल पडक्या घरी दडून बसलेले बिबट (मादी) अखेर जेरबंद

सिंदेवाही :आज 26.02.2023 रोजी ब्रम्हपुरी वनविभागीतील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र- सिंदेवाही, नियतक्षेत्र- सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा कोठा (मुरमाडी) येथिल श्री. अंबादास चिरकुटा श्रीरामे यांचे जुन्या पडक्या घरी बिबट (मादी) दडून असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही (प्रादे.) यांनी अधिनिस्त कर्मचारी व अतिशिघ्र दल सिंदेवाही (RRU) यांचेसह घटनास्थळ गाठले.A leopard (female) hiding in a stranger's house at Kotha (Murmadi) has finally been jailed
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही वनपरिक्षेञा अंतर्गत येणाऱ्या उप वनपरिक्षेत्र सिंदेवाहीतील मुरमाडी (कोठा) गावात शनिवार (दि. २५) च्या मध्यरात्री अंबादास चिरकुटा श्रीरामे यांच्या घरात बिबट प्रवेश केला असल्याचे गावकऱ्यांना दिसुन आला. सुदैवाने घरात समोरच्या खोलीत अंबादास यांच्या भावाची पत्नी झोपलेली होती. बिबट घरात प्रवेश केला परंतु अंबादास यांच्या भावाची पत्नी झोपलेली होती त्या खोलीत बिबट पोहचु शकला नाही त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.

बिबट घरात प्रवेश केला त्या दरम्यान घरातील सर्व हे बाहेर गावी काम करण्यासाठी गेले होते. त्यामुळे घर पूर्ण रिकामा असल्याने अंबादास यांच्या भावाची पत्नी त्या घरच्या समोरिल खोलीत झोपलेली होती. अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली. रविवार (दि. २६) च्या सकाळी अंदाजे ७-८ वाजता च्या दरम्यान नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्या आधारे विशाल सालकर वनपरिक्षेञ अधिकारी सिंदेवाही (प्रादे.), दिपक हटवार क्षेत्र सहायक सिंदेवाही, उसेंडी क्षेत्र सहायक नवरगाव यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले सोबत सिंदेवाही पोलीस सुद्धा घटनास्थळ गाठुन नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीला सांभाळले. घरच्या मागे शेतशिवार असल्याने हा बिबट त्याच बाजूने आला व घरचा मागील दरवाजा पूर्णत: तुटलेल्या परिस्थित असल्याने त्याच दरवाज्यातुन त्याने घरात प्रवेश केला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागने व्यक्त केला आहे.
त्याअनुषंगाने बिबट (मादी) ला जेरबंद करण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अधिनिस्त कर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांनी शर्तीचे प्रयत्न करून सदर बिबट (मादी) ला त्या घरातील एका रूम मध्ये बंद करण्यात यशस्वी झाले. वरीष्ठ अधिकरी यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सदर बिबट (मादी) ला जेरबंद करण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांना पाचारण करण्यात आले व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात अजय मराठे, सशस्त्र पोलिस दल यांनी सदर बिबट (मादी) अचुक निशाना साधून दुपारी 3.10 वाजता डार्ट केला व सदर बिबट (मादी) बेशुध्द झाल्यानंतर त्यास दुपारी 3.25 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदीस्त केले. वरील संपुर्ण कार्यवाही RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर चे कर्मचारी श्री. अतुल मोहुर्ले, वनरक्षक, श्री भोजराज दांडेकर, वनरक्षक श्री. अमोल तिखट वनरक्षक, श्री. सुनिल नन्नावरे, वनरक्षक श्री. अमोल कोरपे, वाहन चालक, श्री अक्षय दांडेकर वाहन चालक, तसेच सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील श्री. विशाल सालकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिंदेवाही, श्री. डी. के. हटवार, क्षेत्र सहायक, सिंदेवाही, श्री. एस. बि. उसेंडी, क्षेत्र सहायक, नवरगांव, श्री. डी. के. मसराम, वनपाल RRU सिंदेवाही, श्री. स्वप्नील बडवाईक, वनरक्षक श्री. सचिन चौधरी, वनरक्षक, श्री विनोद चिकराम, वनरक्षक, श्री. नितेश शहारे, वनरक्षक, श्री. जितेंद्र वैद्य, वनरक्षक श्री. रवि मारभते श्री. कमलाकर बोरकुंडवार, श्री. दिपक बालुगवार वाहन चालक यांनी केली.

सदर कार्यवाही पार पाडतांना पोलिस स्टेशन सिंदेवाही चे स.पो.नि. तुषार चव्हान, पो.उप.नि. सागर महल्ले व त्यांचे कर्मचारी यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य पार पाडले.. जेरबंद केलेला बिबट (मादी) वय अंदाजे 10-12 महीने असून तिला पुढील उपचार व देखभाल करीता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, (TTC) चंदपुर येथे स्थलांतरीत करण्यात येईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment