Ads

परीक्षा केंद्रावर मधमाशांचा हल्ला ; तीन विद्यार्थी शिक्षक जखमी.

राजुरा 1 मार्च :सद्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू आहे. आज दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या परीक्षा केंद्रावर ( केंद्र क्रमांक 0247 ) प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला चढवल्यामुळे तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी झालेत. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठवण्यात आले.
Bee attack on exam centre.Three student teachers injured.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे पेपर सर्वत्र सुरू आहेत. त्या अनुषंगाने आज इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. ठीक आहे 11.00 ते 2.00 या कालावधीत पेपर सुरू असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेश करत असताना प्रवेशद्वारा जवळच मधमाश्याने हल्ला चढवला त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. यात मधमाशांनी चावा घेतल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. यात सुरज भिमनकर व तेजस मुके हे गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. यात मोरेश्वर लांडे (शिक्षक) व दीपक उमरे हा विद्यार्थीही मधमाशांच्या हल्ल्यात सापडले. लगेच परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यात आली. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात करण्यात आली. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण 96 विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पेपर देण्यासाठी खोल्यांमध्ये जात असताना ही घटना घडली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या नैसर्गिक घटनेत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना परीक्षेला उपस्थित होत आले नाही. या घटनेची माहिती केंद्रप्रमुख यांनी कस्टोडियन व बोर्डाला कळविली असल्याची माहिती केंद्रप्रमुख रामटेके यांनी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment