चंद्रपुर: शहीद बाबूराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त जिल्हा कारागृहातील शहीद स्मारकास आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत शहीद बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवादन केले. यावेळी अँड. दत्ता हजारे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाप्रमूख जितेश कुळमेथे, आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमुख वैशाली मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, नरेंद्र मडावी यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला पूढे हाच लढा चंद्रपूरच्या स्वातंत्रलढ्यात परिवर्तीत झाला. ते क्रांतीची मशाल होते. मृत्यूपर्यंत इंग्रजांशी लढा देऊन आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा संकल्प करत त्यांनी जंगम सेनेची स्थापना केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्वाचे आहे, असे भावोद्गार यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रीय योद्धा क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करतांना काढले.
0 comments:
Post a Comment