Ads

तळोधी (बा.)येथील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

(प्रशांत गेडाम)नागभिड :- तळोधी (बा )पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवानावावरून चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी यांनी पोलिस स्टेशन चे सहाय्यक फोऊजदार सुरेश पानसे व पोलीस शिपाई मनीष गेडाम यांना निलंबित केले.Talodhi Ba. Two police personnel here suspended
नवानगर वार्डातील मायाबाई बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरी गेल्या. त्याची तक्रार देण्यात आली. संशयित म्हणून त्याच वार्डात राहणार मनोज मेश्राम या युवकाचे नाव समोर आले . चौकशी करिता मेश्राम यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले व त्यांना मारहाण करून त्यांच्या कडून १५०००रु.पानसे व गेडाम या कर्मचाऱ्यांनी घेतले. व त्यापैकी पाच हजार रुपये मायाबाई ला दिले. मायाबाई ने ते पैसे दुसऱ्या दिवशी परत केले. एकंदरीत हे सर्व प्रकरण पैसे घेऊन दाबन्याचा प्रयत्न हे दोन कर्मचारी करीत होते. या प्रकरणाची माहिती सामाजीक कार्यकर्ते अजीत सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, विभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांना या प्रकरणा बाबत पत्रव्यवहार केला.तसेच विनाकारण मारहाण करून व जबरदस्तीने पैसे घेऊन मानसिक त्रास दिल्या बद्दल मनोज मेश्राम यांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती, तसेच मायाबाई बोरकर यांनी सुद्धा मला न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे दोनही कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसेच सर्वांचे बयान घेण्यात आले व सरतेशेवटी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी तात्काळ दोनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment