Ads

तालुक्यातील खुटवंडा येथील अवैध दारुविक्री बंद करा.

भद्रावतीतालुका प्रतिनिध(जावेद शेख):-भद्रावती तालुक्यातील खुटवंडा या गावात व परिसरात अवैध दारुविक्री जोरात सुरु असुन यामुळे गाव तथा दारुबंद करावी अशी मागणी करणारे निवेदन खुटवंडा येथील महिलांनी भद्रावती पोलीस स्टेशनला दिनांक 13रोज सोमवारला दिले आहे.Stop the sale of illegal liquor in Khutwanda in the taluka.
तालुक्यातील खुटवंडा गावात व परिसरात अवैध दारुविक्री मोठ्या प्रमाणात होत असुन या अवैध दारुविक्रीमुळे गावपरिसरातील महिला तथा लहान मुले त्रस्त झालेली आहेत.या अवैध दारुविक्रीचा विषय ग्रामसभेत सुद्धा घेण्यात आलेला आहे.या अवैध दारुविक्रीमुळे गाव तथा परिसरातील सामाजिक स्वाथ्य बिघडत चालले आहेत.या अवैध दारुविक्रीमुळे परिसरातील लहान मुले व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध दारुविक्रीमुळे महिला तथा शाळेकरी मुलांना त्रास सहन करावा लागत आहे.या अवैध दारुविक्रीमुळे गावपरिसरातील रोज झगडे व कलह निर्माण होत आहे.या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात सुरु असलेली अवैध दारुविक्री बंद करुन येथील महिला व शाळेकरी मुलांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदन देतांना अश्विनी मडावी,मिनाक्षी सेडमाके,साधना कन्नमवार लक्ष्मी जुमनाके यांचे सोबत अन्य महिला उपस्थित होत्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment