Ads

शहरातील मोटरसायकल चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही शहरातील जुना बस स्टॉप च्या बाजूला राकेश निकोळे रा. पेंढरी कोकेवाडा तालुका सिंदेवाही याने आपले मोटरसायकल दुचाकी वाहन क्रमांक एम एच 34 AZ-0238 या क्रमांकाची मोटरसायकल ठेवून बाजारात गेले व बाजार करून मोटरसायकल ठेवलेल्या जागी बघितले असता तिथे मोटरसायकल मिळून न आल्याने सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे चोरीची रिपोर्ट दिली.A motorcycle thief in the city has been arrested by the police
सर्व हकीकत त्याने सांगितले यावरून पोलिसांनी मोटर सायकल चोरीच्या गुन्हा दाखल केला व कशाचाही विलंब न करता अज्ञात मोटरसायकल चोरट्याचा शोध घेत तपास चालू ठेवलाअसता सिंदेवाही शहरात MH-33, AB -0085 ही चोरीची वाहन क्रमांक असलेले नवीन मोटरसायकल चालवताना आरोपी हा संशयितरीत्या मिळून आला त्या सदर आरोपीचा ताब्यातील मोटरसायकल सिंदेवाही पोलीसांनी ताब्यात घेत आरोपीला अटक करून कसून चौकशी केले असता आरोपीने पुन्हा एक मोटरसायकल वाहन क्रमांक - MH-34, AZ-0238 चोरी केली असल्याची कबुली दिल्याने पोलीसांनी लगेच ती मोटरसायकल स्टेशनला जमा केले व सदर आरोपी विरुद्ध अप. क्र.117/2023 नोंद करत 379 भादवी.नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पीएसआय महहले पीएसआय नेरलवार, पोलीस हवालदार बांबोळे ,नानेश्वर डोकळे, मंगेश श्रीरामे यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment