चंद्रपूर : धुलीवंदनाच्या दिवशी (७ मार्च) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घुग्घुस येथील वैकोली वणी कोळसा खाण परिसरातील न्यू कोल रेल्वे साईडिंग येथे चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातून रेल्वे मालगाडीचे इंजिन आले. या मालगाडीच्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेहLeopard Found Death आढळल्याने वन खाते तथा घुग्घुस रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.
याघटनेसंदर्भात घुग्घुस रेल्वे स्थानकाचे अधिकारी राजेश सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी सात वाजता चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातून मालगाडी आली, त्या इंजिनवर बिबट्याचा मृतदेह दिसला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायरच्या कचाट्यात येऊन या
बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. चंद्रपूरचे महाऔष्णिक वीजकेंद्र ताडोबाच्या जंगलाला लागून आहे.येथे वाघ, बिबट्यासह अस्वल व इतरअनेक प्रकारचे वन्य प्राणी वावरत असतात. महाऔष्णिक वीज परिसरातही वाघ, बिबट्या व अस्वलाचे वास्तव्य आहे.
याआधीही महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील जंगलात अनेक वन्य प्राणी दिसले होते. मृत बिबट त्यापैकीच एक असावा, असा अंदाज आहे.
0 comments:
Post a Comment