Ads

भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी :-नारी शक्तीचा सन्मान अधोरे रेखित करणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा पोलीस व भद्रावती पोलीस विभागाच्या वतीने भद्रावती पोलीस स्टेशन परिसरात महिला सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..
या कार्यक्रमाच्या वेळी ठाणेदार विपीन इंगळे हे होते.International Women's Day celebrated in Bhadravati Police Station.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्माpsi. अमोल कोल्हे, psi अमोल तुळजेवार, psi मुळे, psi अशोक बोन्डे, उपस्थित होते.
आपल्या भाषणात ठाणेदार विपीन इंगळेम्हणाले की, स्त्री या देशाचे भविष्य ठरविणारी शक्ती असुन विकसित समाजासाठी स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे, स्त्रीया वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी जबाबदारीने काम करीत असताना घरातही तितक्याच कर्तव्यदक्ष. ते पुढे म्हणाले की, स्त्री मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती अधिक सक्षम बनेल. आज सर्वक्षेत्रात महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यावेळी त्यांनी महिला दिनाचे महत्व विशद केले कार्यक्रमात
महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिला अधिकारी व अंमलदार यांना सुपूर्द करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा ठाणेदार विपीन इंगळे यांच्या  हस्ते  गुलाब पुष्प देऊन सुनंदा बनकर  यांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनाचेऔचित्य अन्य महिला पोलीस व कर्मचारी यांचा सत्कार केला.
या वेळी कार्यक्रमात महिला पोलीस नीलिमा शिल्पा, गीता, हर्षा, शुभांगी, सोनू, संगीता, सुषमा, नम्रता, अश्विनी, दीपमाला,पोलीस कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment