चंद्रपूर - जागतिक महिला दिनी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर शाखेने शहरातील विविध क्षेत्रात संघर्ष करीत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. Chandrapur women's power honored by Maharashtra State Rural Journalist Association
शहरातील सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांचा जागतिक महिला दिनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला.
यासोबतचं लहानश्या शहरातून Tollywood ते Bollywood सिनेसृष्टीत एन्ट्री करीत नृत्य क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावले.
मानसी श्रीधर बुरीले या तरुणीने अवघ्या 22 वर्षात यशाचं सर्वोच्च शिखर गाठले आहे.
मानसी ने आतापर्यंत प्रभुदेवा, पवन कल्याण, रवितेजा, रणवीर कपूर व श्रद्धा कपूर सोबत काम केले आहे.
मानसी च्या अभूतपूर्व यशावर ग्रामीण पत्रकार संघाने दखल घेत शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देत सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कुक्कु साहनी, अध्यक्ष राजेश सोलापन, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, महासचिव पुरुषोत्तम चौधरी, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, प्रभाकर आवारी आदींची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment