Ads

बल्लारपूरच्या वन आगारात जागतिक महिला दिन साजरा

भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक चंद्रपुर प्रदेश, चंद्रपुर व महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर येथील वन विभागाच्या आगारात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.International Women's Day Celebration in Forest Depot of Ballarpur
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपुर वनप्रकल्प विभागाचे व्यवस्थापक व्ही. डब्ल्यू. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडा येथील विभागीय व्यवस्थापक तुषार तडस, चंद्रपूर सहाय्यक व्यवस्थापक दीपिका गेडाम, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी.पाटील तसेच प्रमुख वक्ता म्हणून आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोराचे सहायक प्राध्यापक राहुल तायडे, बल्लारपूर येथील एकांकिका सादरकर्त्या गायत्री रामटेके उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते राहूल तायडे यांनी महिलां करीता आधुनिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तसेच गायञी रामटेके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन वनपाल प्रतीक्षा दैवलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सोनी पंधरे यांनी केले.
कार्यक्रमाला महिला व पुरुष अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या कार्यक्रमानंतर महिलांकरीता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले त्यात प्रथम पारितोषिक विजेते चौधरी मॅडम, अनुषा जट्टलवार, सोनी पंधरे, किरण उईके व द्वितीय पारितोषिक भोसले मॅडम, नागरे मॅडम, ठाकरे मॅडम, हटवार मॅडम व राठोड मॅडम यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात रोहिणी गाडेकर, सहाय्यक व्यवस्थापक, चंद्रपुर, दिपीका गेडाम, सहाय्यक व्यवस्थापक, चंद्रपुर, पोर्णिमा भांबारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रतिक्षा दैवलकर, वनपाल, रोशनी डोंगरे, वनरक्षक, सोनी पंधरे, वनपाल, अश्विनी भगत, वनपाल, पुजा वाढई, वनपाल, अनुषा जट्टलवार, वनपाल सोनु दिवसे, वनपाल, किरण उईके, वनरक्षक, बी. बी. पाटील साहेब यांचा महत्वाचा सहभाग होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment