चंद्रपुर : दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुल यांनी दिनांक २५/०९/२०२३ रोजी मौजा चितेगांव ता. मुल जि. चंद्रपुर च्या हद्दीत नोंदविलेल्या बनावट देशी दारु निर्मीती कारखान्याच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी नामे पवन ऊर्फ गोलू वर्मा हा लातुर शहरामध्ये वास्तव्यास आहे अशी दिनांक ०९/०३/२०२३ रोजी खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली, Golu Verma, the main accused in the case of fake country liquor manufacturing factory, arrested from Latur
त्यानुसार मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर यांनी श्री संदीप राउत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुल, श्री अभिजीत लिचडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपुर शहर, श्री अमित क्षिरसागर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी चंद्रपुर / गडचिरोली तसेच श्री सुदर्शन राखुंडे जवान, श्री जगन पुट्ठलवार जवान यांचे पथक तयार करुन त्यांना लातुर येथे रवाना केले. पथकाने लातुर शहरामध्ये जावुन गस्त घातली असता त्यांना मिळालेल्या माहितीवरुन लातुर शहरामधील शिवाजी चौक, राठी बँकेजवळ असलेल्या कॉफी शॉपमध्ये गुन्हयातील मुख्य आरोपी पवन ऊर्फ गोलू वर्मा आला असता त्याला त्याच ठिकाणी सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईमध्ये अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क लातुर विभागाकडील स्टॉफने सोबत राहुन सहकार्य केले. सदर अटक आरोपीस आज रोजी मा. न्यायालय, मुल यांचे समक्ष हजर केले असता त्याचा दिनांक १३/०३/२०२३ पर्यंतचा एक्साईज (पोलीस कस्टडी) रिमांड मिळालेला आहे.
पुढील तपास संदीप राउत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुल हे करीत
0 comments:
Post a Comment