चंद्रपुर :चंद्रपुर बफर वनपरिक्षेत्रातील मामला उपक्षेत्रात येणाऱ्या वायगांवात एका महिलेवर हल्ला करून बिबट्याने चक्क घरात ठिय्या मांडला.A leopard attacked a woman in vaygaon village and stayed in the house
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील वायगाव येथे बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून चक्क घरात ठिय्या मांडला. दरम्यान, बिबट्याला सात तासाच्या अथक परिश्रमानंतर बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रातील गावात तसेच वनालगतचा गावामध्ये वन्यप्राणी - मानव संघर्ष तीव्र झाला आहे. वन्यप्राणी घरामध्ये शिरकाव करू लागले आहे. चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील मामला उपक्षेत्रात येणाऱ्या वायगांवात एका महिलेवर हल्ला करून बिबट्याने चक्क घरात ठिय्या मांडला.
तब्बल सात तास रिक्यू ऑपरेशन राबविल्या नंतर बिबट्याला बेशुद्ध करून जे्रबंद करण्यात आले. मात्र या घटनेनंतर गावात तणावदुष्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवील्यानंतर वनविभागाचा पथकाने बिबट्याला जे्रबंद केले.
चंद्रपूर बफर वनक्षेत्रातील वायगाव मामला शिवारात काही दिवसापूर्वी एका जखमी वाघाचा मृत्यू झाला होता.
चंद्रपूर बफर वनक्षेत्रातील वायगाव मामला शिवारात काही दिवसापूर्वी एका जखमी वाघाचा मृत्यू झाला होता.
0 comments:
Post a Comment