Ads

मोदी सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. हुकुमशाहीवृत्तीने कारभार करीत अनेक जनविरोधी निर्णय घेतले जात आहेत. काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी Congress leader MP Rahulji Gandhi यांनी मोदी सरकारचा खरा हुकुमशाहीवृत्तीचा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर आणला. त्यामुळे केंद्र सरकारकडून सुडबुद्धीने अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारविरोधात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी ४ वाजता शहरातील गांधी चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.Jail fill Movement of Chandrapur City District Congress Against Modi Govt
देशातील जनतेला भारतीय जनता पक्षाने मोठमोठी स्वप्ने दाखवित सत्ता काबिज केली. त्यानंतर मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने अनेक जनविरोधी निर्णय घेतले आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वाधिक बेरोजगारी वाढली. पिकाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देणारे हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. महिला सुरक्षिततेच्या थापा मारणारे हे सरकार महिलांचे संरक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशातील सर्वच घटकांमध्ये या सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.
तर, दुसरीकडे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशातील सर्व घटकांशी संवाद साधून त्यांचे दुख समजून घेतले. केंद्रातील सरकारचा खरा भ्रष्ट चेहरा जनतेसमोर मांडला. त्यामुळे देशातील जनतेचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार, भाजपकडून खासदार राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच सुडबुद्धीने अनेक ठिकाणी खटले दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुलजींना आज दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या षडयंत्राविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माजी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची अटक करून सुटका केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शफक शेख, माजी महापौर संगीता अमृतकर, ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रवीण पडवेकर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, प्रदीप डे, मनोरंजन रॉय, बापू अन्सारी, एकता गुरले, सकिना अन्सारी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, राहल चौधरी, राजू वासेकर, सुनीता अग्रवाल, दुर्गेश कोडाम, पप्पू सिद्दीकी, राजेश रेवल्लीवार, स्वाती त्रिवेदी, हर्षा चांदेकर, राजवीर यादव, राजू त्रिवेदी, संजय गंपावार, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष ताजू शेख, अॅड. शाकिर मलक, मोहन डोंगरे, प्रशांत भारती, शालिनी भगत, कासिफ अली, नासीर हुसैन, राजीव खजांची, यश दत्तात्राय, मोनू रामटेके, शाबिर शेख, राजेश वर्मा, विजय धोबे, जयश्री जाधव, विजय पोहनकर, दौलत चालखुरे, दिनेश शेडमाके, सौरव ठोंबरे, वैभव रघाताटे, मुन्ना तावाडे. अंकुर तिवारी, प्रवीण नेल्लुरी, नरेंद्र डोंगरे, प्रवीण डोंगरे, साबीर ताजी, मनोज मातुलवार, श्रीकांत आरेवार, शंकर अण्णा, प्रकाश देशभ्रतार, प्रज्वल आवडे, स्वप्नील चिवंडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment