जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती : खेळ कोणत्याही प्रकारचा असो मानवी जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. खेळामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासोबत खेळाच्या माध्यमातून प्रगती हि साधता येते असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी व्यक्त केले. स्थानिक गवराळा येथील वरदविनायक स्पोर्टिंग क्लब तर्फे अहिल्याबाई होळकर चौकातिल मैदानावर तालुकास्तरीय रात्रकालीन टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.Organization of night cricket tournament by Varadvinayak Sporting Club at Gavrala.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा .चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणुसमारे, भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष अमित गुंडावार, सुनील आवारी, विषेश अतिथी विजय डुकरे, किशोर ठाकरी, अमोल देठे, राजू काळे, आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी खेळातून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो करिता युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले.तर गवराळायेथील युवकांनी हि स्पर्धा आयोजित करून परिसरातील युवकांना क्रिडा क्षेत्राकडे आकर्षित केले याचा सार्थ अभिमान असून युवकांनी सामाजिक सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात प्रगती साधावी असे आवाहन चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणुसमारे यांनी केले ,प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय डुकरे यांनी सर्वोतोपरी मदतीचे आस्वाशन दिले. या स्पर्धेत तालुक्यातील 70 संघ सहभागी झाले असून विजेत्या संघांना अनुक्रमे,दहा हजार एक, सात हजार एक, व पाच हजार एक व विविध प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा रामनवमी पर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद घोडे तर आभार प्रदर्शन विक्रांत बिसेन यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब चे अध्यक्ष शंकर ढेंगळे, अमर सावनकर, रितेश बुच्चे, सूरज ढवळे, निलेश टोंगे, शैलेश आस्कर, अक्षय आस्कर, संतोष डवरे,प्रथम गेडाम अरुण उराडे, मधुकर सावनकर धनराज शेरकी यांनी विशेष सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment