Ads

जागतिक महिला दिनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा

चंद्रपूर : Increase in Gas cylinder prices सिलिंडर दरवाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सिलिंडर दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसह महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनी ८ मार्चरोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.Vanchit Bahujan Aghadi march on International Women's Day
सिलिंडर दरवाढ व खाद्यतेलाचे दर कमी करण्यात यावे, महिलांना सुरक्षित व सुलभ शौचालय शहराच्या मुख्य ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, गृहिणींची सरकारने नोंद घ्यायला पाहिजे, मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याचे रायपुरे यांनी सांगितले. न्यू इंग्लिश हायस्कूल मैदानावरून दुपारी १ वाजता मोर्चा प्रारंभ होणार आहे. मोर्चात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तनुजा रायपुरे मोर्चाचे नेतृत्व करतील.

पत्रकार परिषदेला महानगर महासचिव मोनाली पाटील, जिल्हा सल्लागार लता साव, सुलभा चांदेकर, प्रज्ञा रामटेके आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment