तालुका प्रतिनिधी (भद्रावती):- भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितिची निवडणुक 30 एप्रीलला होऊ घातलेली आहे.या निवडणुकीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 18 जागांसाठी 86 ऊमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.86 candidates are in fray for 18 seats
कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतिची एकुण मतदार संख्या एक हजार 72 एवढी आहे.यातवैध ठरणाऱ्या नामनिर्देशन पत्रांची यादी सहा तारखेला प्रसिध्द करण्यात येईल.उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायची असल्यास त्यांना विस एप्रील पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.दिनांक 21ला ऊमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करुन त्यांना निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.तिस एप्रिलला मतदान घेण्यात येईल मतदान पार पडल्यानंतर लगेच मतमोजणी करुन निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.सदर कृषी बाजार समितीत सेवा सहकारी संस्थेच्या अकरा,ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार,अडते व व्यापारी संघाच्या दोन तर हमाल व मापारी संघाची एक अशा एकुण अठरा जागा आहेत.या निवडणुकीत एक हजार 72 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुमारी एस. एस. सनदृ तर सहाय्यक म्हणून सुनील पांडे यांनी काम पाहिले.
0 comments:
Post a Comment