Ads

भद्रावती पोलिसांनी गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या 4 आरोपींना केली अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधि (जावेद शेख) :-  crime newsभद्रावती शहरातील मुख्य मार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या चार आरोपीसह पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. यातील मुद्देमालासह १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ही कारवाई रात्री 8.00 वाजता दरम्यान करण्यात आली.

Bhadravati police arrested 4 accused who came to sell Marijuana

चंद्रपूर हून भद्रावती येत असतांना चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्या आधारे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, शशांक बद्दामवार, जगदीश झाडे ,रोहित चिटगिरे, आशिष गौरकर, मोनाली गारगाटे यांनी सापडा रचून ही कारवाई केली.  यात सौरभ दुर्वास कसारे, ( 22 ) वर्षे , अदनान जाकीर शेख ( 21) वर्षे, लोकेश दौलत मानकर ( 22 ) राहुल दिलीप साखरे ( 21 ) वर्ष सर्व राहणार चंद्रपूर या आरोपींना अटक करण्यात आली व आरोपीकडून पाच किलो गांजासह दोन मोटरसायकल, मोबाईल असा १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाई भद्रावती पोलीस करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment