जावेद शेख तालुका प्रतिनिधी:
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम Sansad Adarsh Gram म्हणून नावारूपास आलेल्या चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ग्रामपंचायती मार्फत प्लास्टिक झाकण्यात आले होते. काही कालावधीतच या बाबीची दाखल घेत १० लक्ष निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील चंदनखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य अशी इमारत आहे परंतु जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे ही इमारत पावसाळ्याच्या दिवसात कवलेरू घरा पेक्षा ही जास्त गळते होती या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहभोवतालील 28 गावे येत असून या 28 गावांतील रुग्णांना सेवा देण्याचे काम या प्राथमिक आरोग्य केंद्रातून चालते परंतु पावसाळ्याच्या दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बिमार पडत होती. या प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर गावातील प्रसूतीची रुग्ण ही आणले जातात आणि कुटुंब नियोजनाचे रुग्ण इथेच आणले जातात पावसाळ्याच्या दिवसात सतत च्या पावसाने इमारत पूर्ण पने गळायला लागायची त्या मुळे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर चक्क प्लास्टिक झाकले होते. ह्या बाबी ची दाखल प्रशासन काही कालावधीत घेतली आणि इमारतीच्या दुरुस्ती साठी १० लक्ष निधी मंजूर करून इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या मुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.
0 comments:
Post a Comment