Ads

सहाव्या वर्गातील विद्यार्थिनीवर 22 वर्षीय युवकाचा लैंगिक अत्याचार

राजुरा :- राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या 6 वर्गातील मुलीवर जंगलात नेऊन 22 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे 22-year-old youth sexually assaulted a 6th class student
या संदर्भातील अधिक माहितीनुसार राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत होती. दिनांक 3 एप्रिल रोजी सदर पीडित शाळा सुटल्यावर खाऊ घेण्याच्या उद्देशाने बाहेर निघाली असता तिथे मागावर असलेल्या 22 वर्षीय युवकाने तिला बोलावले. सदर युवक पीडितेच्या नात्यातील असल्याने मुलगी त्याच्याकडे गेली. त्यांनतर त्याने घरी पोहचवून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर बसविले. या संदर्भात शाळा प्रशासनाने चौकशी केली असता ती विद्यार्थिनी एका युवकाच्या दुचाकीवर बसुन गेल्याचे स्पष्ट आल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना माहिती देऊन मुलीचा शोध घेण्यास सांगितले. मुलगी परस्पर निघुन गेल्याचे कळताच पालकांनी शोध सुरू केला मात्र सदर पीडिता काही वेळाने घरी परतली. पालकांनी मुलीची चौकशी केली असता नात्यातील 22 वर्षीय युवकाच्या दुचाकीने आपण शाळेतून आल्याचे तिने सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा मुलीने त्या युवकाने आपल्याला जंगलात नेऊन अतिप्रसंग केल्याचे पिडितेने सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडितेच्या आईने रात्री 12 च्या सुमारास राजुरा पोलीस स्टेशनला गाठून अत्याचाराची तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकाच्या गावात जाऊन युवकाला अटक केली असुन वैद्यकीय तपासणीअंती त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने पोलिसांनी युवकावर भा दं वी च्या कलम 376, 376 अ, ब, 363 तसेच बाल लैंगिक अत्याचारांच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्ह्याची नोंद करून न्यायालयातून आरोपीची तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment