Ads

जबरी चोरी ,घरफोडी ,मोटर सायकी चोरी करणान्या दोन अट्टल गुन्हेगारांना 24 तासात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरने ठोकल्या बेड्या

चंद्रपुर : दि 15/04/2023 रोजी दुपारी फिर्यादी व त्याची पत्नी हे आपले मुलीला पेपर देण्याकरीता सेंटरला सोडुन मित्राकडे जाण्यास निघाले असता शास्त्रीनगर एस.बि.आय. बँक मुल रोड चंद्रपुर समोरून एक अज्ञात इसम काळया रंगाच्या मोपेड ने पाठीमागुन येवुन तिच्या हातातील पर्स व त्यामध्ये एक वन प्लस कंपनीचा मोबाईल कि 30,000/- रू व नगदी 32,000/-रू असा एकूण 62,000/- रु ची जबरी चोरी झाल्याने पोस्टे रामनगर येथे अपक 396/23 कलम 392 भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.
Within 24 hours local crime branch Chandrapur arrested two persistent criminals who were involved in forcible theft, burglary and motorcycle theft.
सदर गुन्हयाचा स्थागुशा चंद्रपुर हे समांतर तपास करीत असताना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोस्टे रामनगर रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार नामे आशिष उर्फ जल्लाद अकरम शेख वय 19 वर्षे रा. फुक्कट नगर, झोपडपटटी श्यामनगर चंद्रपूर हा आनंद नगर महाकाली कॉलनी वार्ड चंद्रपूर येथे विना कागदपत्राचे मोबाईल विकण्यासाठी संशयास्पद स्थितीत फिरत आहे. अशा माहीती वरुण पोस्टाफ चे मदतीने सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेवूण त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक आकाशी रंगाचा वन प्लस मोबाईल कि 30,000/-य व लोअर च्या खिशात नगदी 8000/रू रूपये असा एकुण 38,000/- रू चा माल जप्त करण्यात आला. आरोपीने एका दिवसा आधी दुपारी शास्त्रीनगर एस बि आय बैंक चंद्रपूर जवळुन एका महीलेची हातातील पर्स हिसकावुन पळुन गेलो त्यामध्ये एक वन प्लस कंपनीचा मोबाईल व नगदी 32,000/-रू होते ते पैसे काढून पर्स कुठेतरी फेकुन दिला असे सांगितले.

पोस्टे रामनगर अप. क. 396 / 23 कलम 392 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला. सदर आरोपीकडुन भिवापुर वार्ड हनुमान मंदिर जवळील चोरीस गेलेली एक काळया रंगाची होन्डा अॅक्टीवा MH 34 AG 8577 कि 50,000/- रू चा माल हस्तगत करण्यात करून पो.स्टे. चंद्रपुर शहर अप क 252 / 23 कलम 379 भादवी अन्वये गुन्हा उघडकीस करण्यात आला. तसेच त्याच सत्रो एकुण तिन घरफोड्या करून सोन्याचांदीचे दागीने नागपुर येथे विकल्याचे सांगितले आहे.

तसेच एस.टि.बस स्टाफ चौक येथे एक इसम हिरव्या रंगाचा फुल शर्ट व लोअर घातलेला असुन हा आपले जवळील बिना कागदपत्राची एक काळा व ऑरेंज रंगाची फॅशन प्रो गाडी क्र MH34U 7031 हि क्रमाकाची गाडी विक्री करीता ग्राहक शोधत फिरत आहे. अशा माहितीवरून आरोपी नामे अमित हिरालाल निषाद वय 38 वर्ष रा. मौलाना झाकीर हुसैन वार्ड बल्लारपुर हल्ले मु छोटु काबळे यांचे घरी, दत्त नगर चंद्रपूर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन बल्लारशाहा सरकारी दवाखान्या समोरून चोरलेली हिरो पेंशन प्रो गाडी के MH34U7031 कि 30,000/-रू हस्तगत करण्यात आली. पो.स्टे. बल्लारपुर अप क 916/22 कलम 379 भादवी चा गुन्हा उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि जितेंद्र बोबडे, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोकों संतोष येलपुलवार व पो.अ. नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, चापोहवा, प्रमोद डंभारे यांनी केली.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment