Ads

मुल येथील दारू भट्टीतुन चोरी गेलेला मुददेमाल स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरने पकडली

चंद्रपुर : दि 16/04/2023 व 17/04/2023 रोजीचे रात्रो दरम्यान भेजगाव ता. मुल येथे आखिल गांगरेड्डीवार यांचे मालकीचे दारू भट्टीतुन 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, 1 पेटी देशी दारूची पेटी, तसेच काउंटरमध्ये ठेवलेले नगदी 2700 रू व देवघरातील नगदी 1500 रू असा एकुण 84,395/- रू चा मुद्देमाल चोरी झाल्याने पो.स्टे मुल येथे अप.क्र. 147/23 कलम 461,380 भादंवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.
Local crime branch Chandrapur caught the accused who was stolen from a liquor Shop in Mul
सदर गुन्हयाचा स्थागुशाने चंद्रपुर हे समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, चंद्रपुर शहर बंगाली कॅम्प परीसरात राजीव गांधी नगर चंद्रपुर येथे राहणारे राकेश महतो याचे घरी चोरीची दारू लपवुन ठेवली आहे अशा माहीती वरून राकेश महतो रा. राजीव गांधी नगर चंद्रपुर याचे घरी पंचासमक्ष गेलो असता राकेश महतो हा पोलीसांना पाहुन मोटरसायकलने पळुन गेला. नमुद ईसमाचे पत्नी पुजा महतो व पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरूम मध्ये लपवुन ठेवलेला चोरीचा मुद्देमाल बियरचे 18 बॉक्स एकुण 54,000 रू चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. तसेच सदर दारू ही राकेश महतो, विनोद उर्फ विककी महतो व ईतर एक अनोळखी इसमाने आणुन ठेवल्याचे पुजा महतो सांगीतले.
पोस्टे मुल अप.क. 147/ 23 कलम 461,380 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो.हवा. नितीन साळवे, पो.हवा. प्रकाश बलकी व पो.अ. मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, मपोअं वाताका दिनेश अराडे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment