भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी:भद्रावती कृषी ऊत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला दिनांक 30 रोज रविवार ला सकाळी सुरुवात झाली. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भद्रावती, जिल्हा परिषद शाळा नंदोरी व जिल्हा परिषद शाळा चंदनखेडा या तिन केंद्रावर शांतेत मतदानाला सुरुवात झाली.या निवडणुकीत ग्रामपंचायत आर्थीक दुर्बल गटातील शेतकरी सहकार शिवसेना पैनलचा उमेदवार व्यंकटी भुक्या हा अविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित 17 जागांसाठी हि निवडणुक होत असुन या निवडणुकीत 1172 मतदार पैकी 1128 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.96% turnout in Bhadravati Agricultural Produce Market Committee elections
या निवडणुकीत शेतकरी सहकार पैनल शिवसेना व कांग्रेस समर्थीत शेतकरी विकास पैनल हे दोन पैनल प्रामुख्याने हि निवडणुक लढवित असल्याने हि निवडणुक अत्यंत चुरशिची होत आहेया वेळी पोलीस बंदोबस्त चोख व दंगा नियंत्रण गाडी तैनात होती. निवडणुकीत अविरोध निवडुन आलेली एक जागा हि शेतकरी सहकार पैनलच्या पारड्यात पडल्याने त्यांचा आत्मविश्वास दुनावला आहे.या निवडणुकीत कांग्रेस खासदार बाळू धानोरकरआमदार प्रतिभा धानोरकर,व शिवसेनेचे रविंद्र शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने या निवडणुकिकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, निवडणूक,निर्णयअधिकारी एस एच संधू वरोरा यांनी काम बघितलेनायब तहसीलदार मलिक पठाण पोलीस सहायक निरीक्षक सुधीर वर्मा यांचे नेतृत्वात पी एस आय किटे, सायंकाळी पाच वाजता नंतर मतमोजणीला सुरुवात होणार असुन आजच रात्रीपर्यंत निकाल जाहिर करण्यात येणार आहे.
0 comments:
Post a Comment