भद्रावती.तालुका प्रतिनिधी
जावेद शेख : चहा तयार करतांना सिलेंडरनी पेट घेऊन आग लागली.या आगीत स्वयंपाक घरातील काही किरकोळ वस्तु जळाल्या.मात्र,वेळीच समयसुचकता दाखवित आजुबाजुच्या लोकांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.सदर घटना शहरातील पद्मावार वाडिपरीसरातील एका घरात दिनांक 1रोज सोमवारला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.सुदैवाने या घटनेत कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.The cylinder caught fire, a major disaster was averted.
शहरातील पद्मावार वाडी परिसरात किशोर अंबाघरे हे गृहस्थ आपल्या कुटुंबासह राहतात.मोलमजुरी करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.घटनेच्या दिवशी घरातील महिलेने चहा तयार करण्यासाठी गैस पेटविला यावेळी सिलेंडरने पेट घेउन आग लागली.हा प्रकार आजुबाजुंच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी समयसुचकता दाखवित मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला.प्रारंभी त्यात यश आले नाही मात्र काही अनर्थ घडण्याच्या आत त्यांना या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.या घटनेत स्वयंपाक घरातील काही किरकोळ वस्तु जळाल्या.याव्यतिरिक्त अन्य मोठे नुकसान झाले नाही.सिलेंडर लिकेज असल्यामुळे सिलेंडरने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.
0 comments:
Post a Comment