तालुका प्रतिनिधी जावेद शेख : एक मे 2023 पासून सुरुवात झाली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,आपल्या दवाखाना नावाने केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले होते,, त्या निर्देशाच्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, व तालुका आरोग्य अधिकारी भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका आरोग्य अधिकारी भद्रावती यांनी गवराला गणेश मंदिर जवळ, व रिपुजी कॅम्प रोड हनुमान नगर भद्रावती येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना चे लोकार्पण भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोला माल्यार अर्पण करून दीप प्रज्वलित करून एक मे 2023 रोज सोमवारला सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले. In Name of Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray hospital inaugurated
माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांचे हस्ते ऑनलाईन डिजिटल प्रणाली द्वारे लोकार्पण करून सुरू करण्याचे ठरविले होते, याकरिता सदर कार्यक्रमास समस्त जनतेने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली होती भद्रावती शहरातील जनसामान्य गोरगरीब व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी पंधरावा वित्त आयोग अंतर्गत येथील जनतेला आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशाने आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळणाऱ्या सेवाप्रमाणेच काही सेवा वगळता सुविधा देण्यात येतील जसे रोग निदान व उपचार गरोदर माता बालक तपासणी बालकांचे लसीकरण, संशय रोग, व कुष्ठरोग, तपासणी रक्त,नमुने घेणे इत्यादी सेवा पुरविण्यात येईल,या कार्यक्रमात तहसीलदार अनिकेत सोनवणे,नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गट विकास अधिकारी डॉक्टर मंगेश आरेवार,वैद्यकीय अधिकारी मनीष कुमार सिंग, डॉक्टर कुंभारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर आसुटकर,पोलीस उपनिरीक्षक सुधीर वर्मा, मुख्याधिकारी विशाखा शेळके, नगरपरिषद उपाध्यक्ष संतोष आमने, नगरसेवक, नगर परिषद कर्मचारी व गणमान्य व्यक्तीउपस्थिती होती,
भद्रावती शहरातील समस्त जनतेने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना यामध्ये येऊन आरोग्य सेवांच्या लाभ घ्यावा अशी आव्हान नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विशाखा शेळके,यांनी आव्हान केले
0 comments:
Post a Comment