भद्रावती तालुका प्रतिनिधी: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी टाकलेल्या रेती घाटावरील धाडीत दोन ट्रॅक्टर सह 9 लाख रुपीए ची मालमत्ता जप्त करण्यात आली. यात 5 आरोपीवर कारवाई करण्यात आली.Bhadravati Thanedar Bipin Ingle took action against two tractors illegally smuggling sand at Pipri Ghat.
तालुक्यातील पिंपरी देशमुख येथील रेती घाटावर अवैधरित्या दोन ट्रॅक्टर रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती ठाणेदार बिपिन इंगळे यांना मिळाली.त्यांनी आपल्या सहकार्यासह धाड टाकली असता त्या ठिकाणी रेती भरीत असलेल्या दोन ट्रॅक्टर सह इंडिगो गाडी अशी एकूण नऊ लाख रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली .यातील आरोपी ट्रॅक्टर मालक मोहन ठाकरे चिरादेवी ,संदीप नांदे पिपरी देशमुख, ट्रॅक्टर चालक प्रशांत माशिरकर 36 मांगली, प्रमोद मिटपल्लीवर 25 गौराळा, शुभम पुल्लरवार सूमठाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment