Ads

तुकूम परिरात स्मशानभुमीसाठी वेकोलिने तात्काळ जागा निर्धारित करावी - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :तुकूम परिसरात नागरी वस्ती वाढत आहे. त्यामूळे येथे आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. या भागात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना नातलगांचा अंत्यविधी पार पाडण्याकरिता दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे तुकुम परिसरात स्मशानमुभी ची मागणी आहे. यासाठी वेकोलि प्रशासनाने सहकार्य करत या भागातील जागा स्मशानभूमी करीता तात्काळ निर्धारीत करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहे.WCL should immediately determine the site for the cemetery in Tukum Area - MLA. Kishore jorgewar
आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल विभाग, मनपा आणि वेकोलिच्या अधिका-र्यांच्या उपस्थितीत स्मशानभूमीसाठी अय्यप्पा मंदिर जवळील वेकोलिच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर दुर्गापूर येथील विश्रामगृह येथे संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या आहेत. या बैठकीला वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, महानगरपालिका कार्यकारी अभियंता विजय बोरिकर, माजी मनपा गटनेते डाॅ. सुरेश महाकुलकर, अशोक मत्ते, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर महानगराचे विस्तारीकरण जलद गतीने होत आहे. त्यामुळे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांकरिता सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. चंद्रपूर येथील तुकूम परिसर स्मशानभूमी नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना अंत्यविधीकरिता दूरवर प्रवास करून जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना लगतच्या परिसरात अंत्यविधी करण्याची जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
तुकूम परिसरालगत वेकोलि अधिनस्त असलेल्या सर्वे क्र. १०७/८ या जागेवर स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. सदर जागा वेकोलि करिता विना उपयोगी आहे. त्याअनुषंगाने जनसामन्यांची भावना लक्षात घेत सदर जागेवर स्मशानभूमी उभारण्याकरिता वेकोलि प्रशासनाद्वारे पुढाकार घेणे आवश्यक असुन येथील एक भुखंड स्मशाभुमीसाठी वेकोलीने निर्धारीत करावा अशा सुचना या पाहणी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment