ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी शहरातील अलंकार सिनेमागृह Alankar Cinema जळून बेचिराख झाले आहे. आगीत सिनेमागृह मधील सर्व साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव अलंकार सिनेमागृह आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिनेमा गृहाला आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला.Fire at Alankar cinema in Bramhapuri, loss of lakhs
मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली हे अजून कळले नाही.
0 comments:
Post a Comment