Ads

कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सूटका

चंद्रपूर : आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली. अब्दुल अजीज अब्दुल रऊफ (२७), जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी (४०) दोघेही रा. गडचांदूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुजममील खॉ वाहाब खॉ (२४) रा. गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Exemption of 19 animals taken for slaughter
आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र. एमएच 27, बी एक्स 5838 येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला. पोलिसांनी जनावरांसह दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात देवाजी निखाडे, विनोद वनकर, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment