चंद्रपूर :ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब यांच्या वर प्रेम करणारे जवळ जवळ पंधरा ते वीस लाख श्री सदस्य राज्यातूनच नव्हें तर इतर राज्यातून सुद्धा खारघर येथे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात एकत्र आले होते.
Khasdar Balubhau Khanorkar will appeal in court in Kharghar death case
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि देश्याचे गृहमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते.
सरकारला मूळातच कार्यक्रमाचे नियोजन करता आले नाही.
बंद हॉल मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावयाचा असतो तो अमित शहा यांच्या आग्रहाखातर जाहीर सभेत रूपांतरित करून श्री सदस्यांची गैरसोय केली.
सदर सोहळा महाराष्ट्र शासनाने आयोजित केला होता आणि त्यासाठी 13,62,51000 कोटी रुपये खर्च करण्यात येऊन सुद्धा नियोजनाच्या ढिसुळ व्यवस्थापणामुळे खारघर येथील श्री सदस्यांचा मृत्यूचा आकडा ५० पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
तसेच हजार पेक्षा ज्यास्त श्री सदस्य वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त आहे.राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे श्री सदस्य गुदमरून,तडफडून,पाण्या
अभावी तसेच चेंगराचेंगरी मृत्यू पावलीत त्यात सर्वश्री राज्य सरकार दोषी असल्यामुळे राज्य सरकार विरोधात खासदार बाळूभाऊ धानोरकर न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कळते.
0 comments:
Post a Comment