भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख):-वेकोलीच्या माजरी क्षेत्रातील नागलोन खाण परिसरात ओव्हर बर्डनची वाहतुक करणाऱ्या एका कंत्राटी कामगाराच्या अंगावर विज पडून त्याचा मृत्यू झाला.सदर घटना दिनांक 25रोज मंगळवारला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ओसी टु नागलोण खाण परिसरात घडली.बाबु धनकुमार यादव असे या मृतक कामगाराचे नाव आहे.Contract worker dies due to lightning in Majri
घटनेची माहिती प्राप्त होताच माजरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली असुन घटनेचा पुढील तपास माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस करीत आहे. मृतक बाबू धनकुमार यादव हा माजरी खाणीतील के जी सिंग कंपनीत कामगार होता. घटनेच्या दिवशी तो खाणीतील ओवर बर्डनची वाहतूक करीत असता अचानक वादळ वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यात अंगावर वीज पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर कामगार मुळचा बिहार राज्यातील असून या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment