चंद्रपूर (प्रतिनिधी ) :- चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्री गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने आयोजित दि.२५ एप्रिल ते ०४ मे २०२३ ला चालणाऱ्या बाल संस्कार जीवन शिक्षण व ग्राम स्वावलंबन शिबिराचे थाटात उदघाटन मा.अशोक धमाने वर्धा यांच्या हस्ते करण्यात आहे. अध्यक्षस्थानी मा.प्रशांत दुर्गे लाभले होते तर प्रमुख अतिथी रामभाऊ ढगे, सोनू मेश्राम प्रशिक्षक,मुक्ता पोईनकर अध्यक्षा महिला मंडळ याची प्रामुख्याने उपस्थिती होती.Grand opening of Child Sanskar Life Education and Village Self Reliance Camp.........
या कार्यक्रमाची सुरुवात अधिष्ठानाला व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत तुकाराम दादा गीताचार्य यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.प्रास्तविक मुरलीधर गोहणे अध्यक्ष तुकारामदादा गीताचार्य प्रतिष्ठान नागपूर यांनी केले .बाल वयात केलेल्या उत्तम संस्काराने जीवन आदर्शवत बनते असे प्रतिपादन प्रशिक्षक सोनू मेश्राम यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अतिथी मुक्ता पोईनकर,मत्ते सर,डोंगरे सर यांनी सर्व शिबिरार्थ्यांना व दहा दिवस चालणाऱ्या शिबिराला शुभेच्छा दिल्या तसेच सुसंस्कार शिबिरे ही सात्त्विक संपत्तीचे आगर असून त्यातून आपली उत्तम ग्राम संस्कृती टिकविण्यासाठी चालना मिळत असते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तुमसरे यांनी केले तर आभार नानाजी बावणे यांनी मानले व शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे
0 comments:
Post a Comment