Ads

चंद्रपुरातील अनधिकृत मोबाईल टॉवर, होर्डिंग उभारणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा जनविकास सेनेची मागणी :मनपा आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे चंद्रपूर शहरातील गायत्री नगर येथील १३१ फुट उंच टॉवर घरावर कोसळल्याची घटना घडली. टॉवर बसवताना नियम धाब्यावर बसवून लावल्याने ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून येते सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहाणी झाली नसली तर घराचे प्रचंड नुकसान झाले. असे प्रकार पुन्हा टाळण्यासाठी शहरातील नियमबाह्य अनधिकृत मोबाईल टॉवर, होर्डिंग उभारणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी मोठ-मोठे टॉवर बसवले आहेत. तसेच संपूर्ण शहरभर मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरात आलेल्या वादळामुळे नियमबाह्यरित्या गायत्रीनगर येथे बसवलेले १३१ फुट उंच असलेले मोबाईलचे टॉवर एका घरावर कोसळले. तर पुणे येथे मोठे होर्डिगही पडल्याची घटना घडली आहे. मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती असतानाही ते थातूमातूर कारवाई करुन धोकादायक मोबाईल टॉवर व होर्डिग्जला अप्रत्यक्ष संरक्षण देत असल्याचा आरोप करत पुढे अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत टॉवर व होर्डिग उभारणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनविकास सेनेतर्फे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख,महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा बोबडे
युवा आघाडीचे अध्यक्ष अक्षय येरगुडे, आकाश लोडे, गितेश शेंडे, नामदेव पिपरे, अमोल घोडमारे उपस्थित होते.
या आहेत मागण्या
शहरातील अनधिकृत व नियम डावलून मोबाईल टॉवर व होर्डिंग उभारणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, गायत्रीनगर मोबाईल टॉवर दुर्घटनेची चौकशी करुन फौजदारी कारवाई करण्यात यावी, मोबाईल टॉवर व होर्डिंग्ज अधिकृत असल्यास त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन धोकादायक मोबाईल टॉवर्स व होर्डिंग तातडीने काढण्यात यावे. आदी मागण्यांचा समावेश आहे.
आयुक्तांचे स्ट्रक्चरल ऑडीटचे आदेश
जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपा आयुक्तांना अनधिकृत टॉवर व होर्डिंग्जमुळे भविष्यात होऊ शकणाऱ्या दुर्घटनेचा धोका लक्षात आणून देताच त्यांनी लगेच शहरातील सर्व मोबाईल टॉवरचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले. तसेच नियमबाहृय टॉवर व होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासनही मनपा आयुक्तांनी देशमुख यांना दिले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment